सागर मधुकर पेटाडे

जनसेवेचा विश्वासार्ह चेहरा

आपला विश्वास – माझी प्रेरणा

मी सागर मधुकर पेटाडे,
सेवा, संवेदना आणि सक्षम नेतृत्व या मूल्यांवर विश्वास ठेवून
मी गेल्या अनेक वर्षांपासून जनतेसाठी सातत्याने कार्यरत आहे.मी राजकारणाकडे पद म्हणून नाही,तर जबाबदारी आणि सेवाभाव म्हणून पाहतो.

सेवा व संवेदना

मी जनतेच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य देतो. नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी
प्रामाणिक प्रयत्न करणं ही माझी कार्यपद्धती आहे. सेवा ही माझ्यासाठी कर्तव्य आहे आणि संवेदना ही त्या कर्तव्याची प्रेरणा आहे

जनतेशी थेट संवाद

मी जनतेशी थेट संवाद साधण्यावर विश्वास ठेवतो. प्रत्येक नागरिकाचं म्हणणं ऐकून घेणं आणि त्यांच्या प्रश्नांवर तत्काळ प्रतिसाद देणं ही माझी कार्यशैली आहे.
संवाद, पारदर्शकता आणि विश्वास हीच माझ्या नेतृत्वाची खरी ओळख आहे.

संघटन व नेतृत्व

मी संघटनाला विकासाची खरी ताकद मानतो. कार्यकर्ते आणि नागरिकांना एकत्र घेऊन सामूहिक प्रयत्नांतून सकारात्मक बदल घडवणं हा माझ्या नेतृत्वाचा उद्देश आहे. एकजूट, शिस्त आणि जबाबदारी या मूल्यांवर माझं नेतृत्व आधारलेलं आहे.

विकासाचा दृष्टिकोन

मी विकासाकडे केवळ घोषणा म्हणून नाही, तर प्रत्यक्ष कृती म्हणून पाहतो. नागरिकांच्या गरजा लक्षात
घेऊन शाश्वत आणि.सर्वसमावेशक विकासातूनच समृद्ध समाज घडू शकतो हेच माझ्या विकासदृष्टीचं अंतिम ध्येय आहे.

मी सागर मधुकर पेटाडे,
भारतीय जनता पार्टी – पुणे शहराशी कार्यरत असलेला एक सक्रिय आणि निष्ठावंत कार्यकर्ता आहे.
सेवा, संवेदना आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांवर विश्वास ठेवून
मी गेल्या अनेक वर्षांपासून जनतेसाठी सातत्याने कार्य करत आहे. लहानपणापासून समाजातील विविध प्रश्न, समस्या आणि गरजा मी जवळून अनुभवलेल्या आहेत. सामान्य नागरिकांच्या अडचणी, संघर्ष आणि अपेक्षा
यांची जाणीव असल्यामुळेच जनतेसाठी काहीतरी ठोस आणि सकारात्मक करावं हा विचार माझ्या कार्याची प्रेरणा ठरला. राजकारणाकडे मी केवळ पद किंवा प्रतिष्ठा म्हणून पाहत नाही, तर जनतेची सेवा करण्याची एक मोठी जबाबदारी म्हणून पाहतो.
नागरिकांच्या प्रश्नांसाठी नेहमी उपलब्ध राहणं, त्यांच्या समस्या ऐकून घेणं आणि प्रशासनाशी समन्वय साधून उपाय शोधणं
हीच माझी कार्यपद्धती आहे.

 

Scroll to Top